
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे खेडमध्ये पडसाद ; माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन
खेड : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल केलेल्या विधानाचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये उमटले. दापोली विधान सभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली अब्दुल सत्तार यांचा प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढून त्या पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना निवेदन देऊन अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राजकारणातील सारे विधिनिषेध बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अतिशय आक्षेपार्य विधान केले, असे गलिच्छ विधान करून न थांबले नाहीत तर त्यांनी अनेकदा त्या गलिच्छ शब्दाचा वापर केला. अब्दुल सत्तार यांच्या या विधानानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली, ज्या सुप्रिया सुळे यांना संसदेत संसदरातन म्हणून अनेकदा गौरविण्यात आले, ज्याचा सन्मान करण्यात आला अश्या सुसंस्कृत महिला खासदाराबाबत मंत्रिपदावर असलेल्या अब्दुल सत्तार यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्य विधान करणे हे अशोभनीय असल्याने त्यांना आता आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या प्रवृत्तीचा जाहीर निषेध जातो या शब्दात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या,
महिला खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपाहार्य विधान करण्याऱ्या अब्दुल सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढून येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात त्यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले त्यानंतर त्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.