
रत्नागिरीत सलग दुसर्या दिवशी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
रत्नागिरी: शहरात आत्महत्येचे प्रमाण वाढू लागले आहे. शहरानजीकच्या आरटीओ कार्यालयासमोरील रेल्वे रुळावर सलग दुसर्या दिवशी एका तरुणाने रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. ही घटना रविवार 25 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. सुमारास निदर्शनास आली. राजेंद्र रवींद्र सावंत (वय 22, रा. वळके बौध्दवाडी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तरुणाचे काका शुभानंद माणिक सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.