सिधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे 22 कोटी 37 लाख रुपये किमतीची व्हेल माशाच्या उलटी जप्त ,सहा जण ताब्यात

सिधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे व्हेल माशाच्या उलटीची (अ‍ॅम्बरग्रीस) तस्करी करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तस्करांकडे 22 किलो 370 ग्रॅम वजनाचा व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थ (अ‍ॅम्बरग्रीस) मिळून आला.ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 22 कोटी 37 लाख रुपये इतकी किंमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तस्करांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पोलीस तपास करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांना त्यांच्या बातमीदारामार्फत सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड या ठिकाणी व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहीती प्राप्त झाली. प्राप्त माहीतीची खातरजमा करुन कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी संदिप भोसले यांनी दिले. त्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकरी व अंमलदार यांच्या पथकाने देवगड पवनचक्की गार्डन समोर सापळा रचून 4 पुरुष व 2 महिलांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्याकडे 22 किलो 370 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी मिळून आली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button