कुवारबाव येथून दुचाकी लांबवली

0
107

रत्नागिरी : कुवारबाव येथून अज्ञाताने दुचाकी लांबवली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना मंगळवार 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत चेतन गंगाराम कळंबटे (वय 39, रा. झरेवाडी, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सकाळी त्यांनी आपली स्प्लेंडर दुचाकी (एमएच-08-एएम-8220) कुवारबाव येथील हॉटेल प्रभाच्या डाव्या बाजूला उभी करून ठेवली होती.
ती चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलिस हवालदार जाधव करत
आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here