
रत्नागिरी शहरातील एकता मार्गावरील संसारे गार्डन रात्री बनत आहे अमली पदार्थाचे सेवन करणार्यांचे तसेच मद्यपीचा अड्डा
( आनंद पेडणेकर ) मारुती मंदिर जवळील संसारे गार्डन येथे अमली पदार्थाचे सेवन तसेच मद्यपी आणि प्रेमी युगलीची अश्लील प्रकार पाहावयात मिळत आहेत दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत आहे याठिकाणी आपला कार्यभाग साधण्यासाठी स्ट्रीट लाईट बंद करण्यात येतात . या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी रत्नागिरी नगर परीषदेचे इंजिनियर यांना संपर्क सांधून सदरच्या स्ट्रीट लाईट चालू करून घेतल्या नंतर काही तासात बंद केल्या जात आहेत . संसारे गार्डन मधिल अपंग असलेले वॉचमन आपल्या परीने काम करीत असतो परंतु त्यालादेखील वांरवार धमकावून उत्तर पश्चिम कोपऱ्यावरील शौचालयाजवळ गार्डन मधील बैठका आणून बसवल्या आहेत आणि या ठिकाणी विविध प्रकार सुरु असतात या गार्डन मध्ये लहान मुले खेळण्यासाठी येतात परंतू या विकृत लोकांमुळे या मुलांवरती विपरीत परिणाम होऊ शकतो . या बाबतची तकार केल्यास राजकीय हस्तक्षेप करून हे प्रकरण दाबले जाते . या ठिकाणी सफेद रंगाची दुचाकीवाला येऊन स्टीट लाईट बंद करताना येथिल रहिवांशानी पाहिले आहे. त्याला या संबंधी विचारणा केली असता अर्वाच्य शिवीगाळ करून पळून जातो तरी अशा प्रवृत्ती च्या लोकांना आळा कोण घालणार असा प्रश्न गार्डन मध्ये येणारे जेष्ठ नागरीक विचारत आहेत . या गार्डन मधिल रंगीत कारंजांचे नोझल काडून हे कारंजे बंद पाडण्यात आले आहेत तसेच या ठीकाणचा हाय मास्क अर्ध्या वरती खाली आणण्यात आला आहे हे सर्व उपदव्याप कोण करतेय ? या ठीकाणी असणाऱ्या वॉचमन चे कोणीही ऐकत नाही . संसारे गार्डन जवळील एकता मार्ग ते राजापूरकर कॉलनी या रस्त्यावरती चालणारे गैरव्यवहार कधी थांबणार पददिपाचे बंद होण्याचे प्रकार कधी थांबणार अंमली पदार्थ सेवन करण्यांवर कधी कारवाही होणार की राजकीय पुढारी यावर मध्यस्ती करणार काय … ! तसेच स्थानिक गुन्हेगारांवर वचक ठेवणारे पोलिस याबाबत कारवाई करणार का? व मुख्य अधिकारी रत्नागिरी नगर परिषद हेदेखील यावर कारवाई करणार का? असा सवाल या भागातील नागरिक करीत आहेत
www.konkantoday.com




