
दसरा मेळाव्याला शिवतिर्थावर पुन्हा ठाकरेंचाच आवाज घुमणार
शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला शिवतिर्थावर पुन्हा ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.दसऱ्याचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच शिवसेनेमध्ये दसरा मेळाव्यावरुन जोरदार संघर्ष सुरू झाला होता. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे यंदाही दोन दसरा मेळाव्याच्या सभा पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर सभा कोण घेणार? यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू झाली होती.
शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी दोन्ही गटाकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. याबाबत आता सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास उद्धव ठाकरे गटाला पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर पुन्हा ठाकरेंचीच डरकाळी पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
www.konkantoday.com