कोकण रेल्वे सुरक्षित हातात, आरपीएफने आपली विश्वासार्हता अधिक मजबूत केली


कोकण रेल्वेवरील प्रवाशांची सुरक्षा, सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करण्यात रेल्वे संरक्षण दल महत्त्वाची भूमिका बजावत असून सततची दक्षता, त्वरित कारवाई आणि लोककेंद्रित उपक्रमांमुळे आरपीएफने आपली विश्वासार्हता अधिक मजबूत केली आहे.
केंद्रित व परिणामकारक ऑपरेशन्सद्वारे आरपीएफने प्रवासी सुरक्षा, गुन्हेगारी प्रतिबंध आणि मानवतावादी मदत या क्षेत्रात लक्षणीय यश मिळवले आहे. गेल्या कॅलेंडर वर्षात ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफने २५२ प्रवाशांच्या मागे राहिलेल्या वस्तू शोधून काढून संबंधितांनी यात केल्या. या वस्तूंची एकूण किंमत सुमारे ११२.४८ लाख ७७ रुपये इतकी असून, त्यामुळे रेल्वे सुरक्षा अवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
बालसुरक्षा व सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत ’ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ९८ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली. संभाव्य शोषण टाळण्यासाठी या मुलांना चाइल्ड हेल्पलाइनकडे सुपूर्द करून त्यांची योग्य काळजी व पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात आली. रेल्वे परिसरातील बेकायदेशीर कारवायांविरोधात राबविण्यात आलेल्या ’ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत १०.७१ लाख रुपयांच्या ६,८७७ बेकायदेशीर दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी ६५ दारू तस्करांना अटक करण्यात आली असून, रेल्वे मार्गावरील अवैध व्यापारावर प्रभावी आळा घालण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button