‘भारत शिक्षण’च्या विद्यार्थ्यांची खारफुटी वनक्षेत्राला भेट

0
36

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र व निसर्ग मंडळ विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय खारफुटी संवर्धन दिनानिमित्त शिरगाव येथील खारफुटी क्षेत्राला भेट देण्यात आली. क्षेत्रभेटीत महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख विनय कलमकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या परिसरात आढळणार्‍या खारफुटी प्रजाती व जैवविविधतेची माहिती दिली आणि खारफुटी वनस्पतींच्या संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. क्षेत्रभेटीसाठी महाविद्यालयातील तीनही शाखेतील, निसर्ग मंडळातील एकूण 52 विद्यार्थी व निसर्ग मंडळ प्रमुख ऋतुजा भोवड,  प्रा. वैभव घाणेकर, प्रा. वैभव कीर, प्रा. मिथिला वाडेकर सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here