
कशेडी बोगद्यातून जाणारी वाहनेही वाहतूक कोंडीत, प्रवाशांचा मनस्ताप कायम
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यातून सुरू झालेल्या दुतर्फा वाहतुकीमुळे प्रवास वेगवान झाला असला तरी प्रवाशांचा मनस्ताप अजूनही कायमच आहे. रविवारी बोगद्यातून काही अंतरावर लागलेल्या लांबच लांब रांगामुळे प्रवाशांना घामच फुटला. वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा आणताना कशेडी येथील महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांची त्रेधातिरपीट उडाली.विकेंडमुळे कशेडी बोगद्यातून मुंबईच्या दिशेने व मुंबईहून कोकणाच्या दिशेने येणार्या वाहनांची संख्या लक्षणीय होती. कशेडी बोगद्यातून केवळ हलक्या वजनांच्या वाहनांसाठीच वाहतुकीस मुभा दिली असतानाही अवजड वजनाची वाहनेही दोन्ही बाजूने धावत असल्याने वाहतूक व्यवस्थेतील गोंधळ अजूनही कायमच आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने अद्यापही ठोस उपाययोजनांचा अवलंब न केल्याने याचा फटका हलक्या वजनांच्या वाहनचालकांना बसत आहे. www.konkantoday.com