संगमेश्वर तालुक्यात अंगणवाडी सेविकांची पदभरती
संगमेश्वर : तालुक्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील 10 अंगणवाड्यांमध्ये सेविका व मदतनीस पदाची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी वंदना यादव यांनी केले आहे.
तालुक्यातील भेंडे तर्फ फुणगूस, कोळंबे बौद्धवाडी, डावखोल व ओझरे बुद्रुक या अंगणवाडीतील सेविकांची पदे भरावयाची आहेत. मिनी अंगणवाडीमध्ये आंबवली धनगरवाडी व निनावे या सेविकांची पदे तर मदतनीस म्हणून करजुवे गौतडेवाडी, धामापूर भडवळेवाडी, अंत्रवली व देवरूख मधलीआळी या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
उमेदवारांसाठी रिक्त पदांचे नियम व अटी तसेच शैक्षणिक पात्रता याचा जाहीरनामा, विहीत नमुन्यातील अर्जाचा नमुना ग्रामपंचायत व एकात्मिक बालविकास सेवा योजना संगमेश्वर कार्यालयात उपलब्ध करण्यात आला आहे. अर्ज 17 जुलैपर्यंत सायंकाळी 6.15 या वेळेपर्यंत जमा करावेत. या दिवसापर्यंत उमेदवारांचे वय 21 ते 30 असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त स्थानिक उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन सभापती व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.