चिपळुणात काँग्रेस, राष्ट्रवादीत आघाडीसाठी बैठक
चिपळूण : चिपळुणात काँग्रेस, राष्ट्रवादीत आघाडी व्हावी की नाही या संदर्भात राष्ट्रवादीच्या वतीने बैठक घेण्यात आली व या विषयावर चर्चा करण्यात आली. नगरपालिका निवडणूक लक्षात घेता दर महिन्याच्या 5 आणि 20 तारखेला आ. शेखर निकम यांच्या कार्यालयात बैठक घेण्याचे ठरले. यावेळी आ. शेखर निकम, माजी आ. रमेश कदम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खातते, शौकत मुकादम, मिलिंद कापडी, शिरीष काटकर, सुचय रेडीज यांच्या प्रमुख उपस्थित कार्यकर्त्यांचा अडीअडचणी समजून घेतील. त्याचप्रमाणे नगर परिषदसाठी इच्छुक उमेदवारांनी चिपळूण पक्ष कार्यालयात उमेदवारी अर्ज मिळतील असे ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाची बैठक पाग येथील सभागृहात झाली. काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्ष असून आघाडी असताना मागील काही वर्षांमध्ये नगरपरिषद निवडणुकीत चांगले यश संपादन केले. येणार्या काळातही याच प्रकारची आघाडी प्रस्ताव काँग्रेसकडून आल्यास आघाडीची तयारी आहे, असे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष खताते म्हणाले की, आ. निकम यांची मागील अडीच वर्षाची कामगिरीचा अभिनंदन ठराव घेण्यात आला. तसेच आघाडी न झाल्यास प्रत्येक प्रभागातून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती आहे. तसेच ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी नाराज न होता पक्षाचे काम करणे गरजेचे आहे.