
सिंधुदुर्ग तारामुंबरी खाडीपात्रात बुडून मच्छीमाराचा मृत्यू.
देवगड तारामुंबरी मुरमणेवाडा येथील मच्छीमाराचा तारामुंबरी खाडीपात्रात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह काही अंतरावर मिठमुंबरी बागवाडी येथील नस्ताच्या ठिकाणी आढळून आला. ही घटना रविवारी (दि.३) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.संतोष तुकाराम सारंग (वय ४५) असे या मच्छिमाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संतोष सारंग हे आज (रविवारी) दुपारी २.३० च्या सुमारास मच्छीमारीसाठी तारामुंबरी खाडीपात्राकडे गेले होते. यावेळी त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सायंकाळी ५ च्या सुमारास मिठमुंबरी बागवाडी येथील नस्तातील पाण्यात तरंगताना तेथील ग्रामस्थांना निदर्शनास आला