
सत्तास्थापनेनंतर देवरूखमध्ये भाजपाकडून विजयोत्सव
देवरूख : भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना सरकारची स्थापना झाल्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याचा शपथविधी होताच देवरूखमध्ये भाजपच्यावतीने फटाके वाजवून गुरुवारी रात्री जल्लोष साजरा करण्यात आला. देवरूख शहरातील नाकानाक्यात हे फटाके वाजवून भाजपा सरकारचा जयघोष करण्यात आला. यात देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा देखील देण्यात आल्या. राज्यात सत्ता स्थापन होताच हा जयघोष
झाला. यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष अभिजित शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, कुंदन कुलकर्णी, युवा नेता भगवतसिंह चुंडावत, नगरसेवक राजेंद्र गवंडी, वैभव कदम आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत होता.