रत्नागिरीत आज सायकल रॅलीचे आयोजन

  • आझादी का अमृत महोत्सव – इंडिया ७५ कार्यक्रम अंतर्गत 6 ते 12 जून दरम्यान आयकॉनिक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीत आज छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम ते लोकमान्य टिळक जन्मस्थाना पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली. महाराष्ट्रातील काही आयकॉनिक जिल्ह्यांमध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्र क्रीडा विभागाच्या वतीने रत्नागिरी, पुणे, नागपूर, व वर्धा हे चार जिल्हे आयकॉनिक जिल्हे म्हणून निश्चित केले गेले आहे.या सायकल रॅली मध्ये सायकल चालवा व निरोगी राहा असा संदेश देखील देण्यात आला होता.या रॅलीत विध्यार्थी व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
    www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button