
सिंधुदुर्ग जिह्याच्या पुरातत्त्व वैभवात भर घालणारी आणखी 35हून अधिक कातळशिल्पे उजेडात
रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिह्याच्या पुरातत्त्व वैभवात भर घालणारी आणखी 35हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील खोटले, (तालुका- मालवण) गावच्या धनगरवाडी सडय़ावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे.विशेष म्हणजे, येथे आढळलेले ‘लज्जागौरी’सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे अशी शक्यता आहे. मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्टही झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक व ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली.
सतीश लळीत गेली 21 वर्षे सिंधुदुर्ग जिह्यातील कातळशिल्पांचे संशोधन व अभ्यास करीत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर कातळशिल्पे सापडली असून त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे त्यादृष्टीने सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत
www.konkantoday.com