
रत्नागिरी एसटी आगारात डिझेलची टंचाई सुरूच अनेक फेऱ्या रद्द
गेले काही महिने रत्नागिरी आगारातील डिझेल पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे वाहतूक व्यवस्था मधून मधून कोलमडत आहे रत्नागिरी एसटी विभागाला मिरजेतून डिझेल पुरवठा करण्यात येतो रत्नागिरी अागाराला दिवसाला अंदाजे १२हजार डिझेल लागते परंतु अनेक वेळा डिझेल वेळेवर येत नसल्याने डिझेल टंचाई निर्माण होत असते कालदेखील डिझेल संपल्याने एसटी आगारातील २१८शहरी व ग्रामीण फेऱ्या रद्द करण्यात आल्या ऐनवेळी फेऱया रद्द झाल्याने एसटी प्रवासी विद्यार्थी यांना त्याचा मोठा फटका बसला.
www.konkantoday.com