पुढील वर्षांपासून मराठमोळा पदवीदान दीक्षांत सोहळा होणार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

0
98

दीक्षांत सोहळ्याचा वेळ कमी करा. एमबीएसारखा एंनर्जेंटिक कार्यक्रम हवा, इंग्रज गेले आता आपण आपली प्रथा सुरू करू. दीक्षांत मिरवणूक विद्यार्थ्यांची हवी. किती लांब कार्यक्रम असतो दीक्षांत.अनेकांना झोपा येतात. विद्यार्थ्यांचे कार्यक्रम त्यांच्यासाठी असायला हवे. पदवीदान कार्यक्रमात इतकी भयाण शांतता बरी वाटत नाही. इंग्रजांनी लावलेली दीक्षांतची पध्दती बंद करून पुढील वर्षांपासून मराठमोळा पदवीदान दीक्षांत सोहळा होईल असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. नागपूर शासकीय तंत्रनिकेतनच्या पदवीदान सोहळ्यात हे बोलत होते
दीक्षांत सोहळा हा कार्यक्रम उत्साहाचा असायला हवा. तरुणांच्या कलाने कार्यक्रम हवा. तुमचा वेतन आयोग माझ्या दृष्टीने गौण आहे. विद्यार्थी महत्वाचा
आहे. त्यामुळे त्यांना काय हवे याचा विचार होणार की नाही. त्यामुळे दीक्षांतची ही प्रथा बदलायला हवी. यापुढे दीक्षांत सोहळे मराठमोळ्या पद्धतीने होतील असे सामंत यांनी सांगितले
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here