दार उघड बये दार उघडं!बांदेकर भावोजी आज रत्नागिरीत,स्वा. नाटयगृहात महिलांची तोबा गर्दी
साडेअकरा लाखांची पैठणी कोण जिंकणार? महिलांमध्ये उत्सुकता
दार उघड बये दार उघडं ! म्हटलं की, डोळयासमोर उभे राहतात ते महिलांचे आवडते भावोजी आदेश बांदेकर. महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेला शो महामिनिस्टर (होम मिनिस्टर) आज रत्नागिरी येथील सावरकर नाटयगृहात निवड चाचणी होत आहे. या पार्श्वभूमीवर साडेअकरा लाखाची पैठणी मिळवण्यासाठी आणि रत्नागिरीच्या महामिनिस्टर होण्यासाठी महिलांनी सकाळी 7.30 वाजल्यापासून सावकर नाटयगृहासमोर रांगा लावल्या आहेत. महिलांचा उत्साह दिसून येत आहे. बांदेकर भावोजींना पाहण्यासाठी महिलांचे डोळे लागलेले आहेत. निवड चाचणीनंतर आता कोण महिला रत्नागिरीची महामिनिस्टर होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.