सौर कृषिपंप योजनेत रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश; 31 मे पर्यंत अर्जास मुदतवाढ
रत्नागिरी : सौर कृषिपंप योजनेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेची अंमलबजावणी यंदाही करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत हे सौर कृषिपंप मिळणार असून, त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन महाऊर्जाने केले आहे.
शेतकर्यांस ई-पोर्टलवर अर्ज करण्यास लाभार्थी हिस्सा भरण्यास व इतर अंमलबजावणी संदर्भात अडीअडचणी आल्यास महाऊर्जाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयातील वेळेवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीची सुधारित अंतिम मुदत 31 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. राज्यातील महाकृषी अभियानांतर्गत प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेतून सौर कृषिपंप बसवण्यात येणार आहेत. महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर अर्जदार शेतकर्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएसद्वारे कळवण्यात आले आहे. त्यानुसार अर्ज करावेत, असे आवाहन कले आहे.