नृत्यार्पण डान्स अकॅडमीच्या वतीने आयोजित नृत्य शिबिर उत्साहात.

रत्नागिरीतील नृत्यार्पण डान्स अकॅडमीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही भरतनाट्यम ya नृत्य प्रकाराचे शिबिर घेण्यात आले. ३ आणि ४ मे रोजी सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या सभागृहात अतिशय उत्साही वातावरणात पार पडलेल्या या शिबिरात २० मुले सहभागी झाली होती.

या शिबिरामध्ये नृत्यार्पण डान्स अकॅडमीच्या संचालिका आणि भरतनाट्यमच्या गुरू सौ. प्रणाली तोडणकर-धुळप यांच्यासह करवीर (जि. कोल्हापूर) येथील भरतनाट्यममध्ये एमए शिक्षण घेतलेले तसेच बीए कीर्तनशास्त्र असलेले ओंकार पाटील यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात भरतनाट्यमची ओळख, हालचाली, तालाचे ज्ञान, हावभाव, व्यायाम, मजेदार उपक्रम, खेळ, अडवू, नृत्य रचना तसेच रंगप्रवेशम्, विष्णू कौतुकम्, तोडयमंगलम् या रचना शिकवण्यात आल्या. शिकवलेल्या रचनेच्या नोट्स, ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात देण्यात आले. शिबिरात सहभागी झालेल्या सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button