रत्नागिरी : नगर परिषदांचे 7 जूनपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे चिपळूण, खेड, रत्नागिरी आणि राजापूर नगर परिषदांच्या निवडणुका पावसाळ्यात गाजणार आहेत. मात्र भर पावसाळ्यात प्रचार करणार्यांची आणि यंत्रणेची तारांबळ उडणार आहे. जिल्ह्यातील नगर परिषदांची पाच वर्षांची मुदत गेल्या 27 डिसेंबर रोजी संपली. मे महिन्याच्या अखेरपर्यंत निवडणुका होऊ शकतील, असा अंदाज बांधला जात होता. इतर मागास प्रवर्ग आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्याने मागील प्रभाग रचना आणि मतदार यादी कार्यक्रम राज्य शासनाने रद्द केला होता. आता इतर मागास प्रवर्ग संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे. अंतिम प्रभाग रचनेला 6 जूनपर्यंत मान्यता देऊन ती 7 जून रोजी प्रसिद्ध करण्यास सूचित करण्यात आले आहे.
Home स्थानिक बातम्या नगर परिषदांच्या निवडणुका पावसाळ्यात? अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी 7 जूनची डेडलाईन