
चिपळूण येथील भाऊ कार्ले यांना राष्ट्रीय एकात्मता आणि दीपस्तंभ पुरस्कार.
चिपळूण येथील हौशी रंगभूमीवर १९८४ पासून योगदान दिल्याबद्दल व नाट्य क्षेत्रामध्ये सुमारे तीनशे पारितोषिक व विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील ११ पुरस्कार प्राप्त जेष्ठ नाट्यकर्मी प्रसाद उर्फ भाऊ कार्ले यांच्या २०२४ व २०२५ साठी जाहीर झघलेले राष्ट्रीय एकात्मता व दीपस्तंभ या दोन पुरस्कारांचे दि. ५ जानेवारी रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान सोहळा दिमाखात संपन्न झाला.
या त्यांच्या दोन पुरस्कारांबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतूक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाऊ गेली चाळीस वर्षे एकांकिका, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नाट्य शिबिरे आणि विविध स्पर्धांचे सातत्याने आयोजन करीत रंगभूमी जीवंत ठेवण्याचे कार्य निःस्वार्थीपणे करीत आहेत.www.konkantoday.com