१४५ आमदारांचं बहुमत आणा आणि राज्याचा प्रमुख व्हा.”अजित पवारांचा रावसाहेब दानवेंना सल्ला

0
128

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी “मी ब्राह्मणाला मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो” असं वक्तव्य केलं केलंयानंतर या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. “मुख्यमंत्री कोणीही होऊ शकतं. तृतीयपंथी व्यक्ती देखील मुख्यमंत्री होऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री कोणीही होऊ शकतं. तृतीयपंथी व्यक्ती देखील मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्याही जाती-धर्माची व्यक्ती, मुख्यमंत्री होऊ शकते. महिला देखील मुख्यमंत्री होऊ शकते आणि आपणही मुख्यमंत्री होऊ शकतात. १४५ आमदारांचं बहुमत आणा आणि राज्याचा प्रमुख व्हा.”

www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here