मध्य रेल्वेचा मसाज सेवा देण्याचा निर्णय अखेर मागे
मध्य रेल्वेतर्फे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मसाज सुविधा पुरवण्याचा घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात आला आहे.मध्य रेल्वेतर्फे काही दिवसांपूर्वी इंदूर येथून सुटणाऱ्या ३९ लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सकाळी सहा ते रात्री दहा यावेत डोक्याची आणि पायांची मसाज देण्याची सुविधा जाहीर करण्यात आली होती.या निर्णयाला कडाडून विरोध झाल्यानंतर प्रशासनातर्फे हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.