नितेश राणे यांच्या रणनितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची बिनविरोध एक्सप्रेस अखेर सुसाट


सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप नेते, पालकमंत्री नितेश राणे यांनी गेल्या चार पाच दिवसात युद्धपातळीवर आखलेल्या रणनितीमुळे भाजपची बिनविरोध एक्सप्रेस अखेर सुसाट निघाली असून मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे 7 जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे 16 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.शिवसेनेचा एक जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचा एक सदस्य असे मिळून 2 उमेदवार शिवसेनेचे बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि ठाकरे शिवसेना बॅकफुटवर गेली असून आता उरलेल्या 100 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

सर्वात जास्त बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघात आहे. या विधानसभा मतदारसंघामधील देवगड तालुक्यात भाजपचे सर्वात जास्त 4 जिल्हा परिषद उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button