
आता अँमेझॉन फ्रेशची आपल्या ग्राहकांसाठी मँगो फिएस्टाची घोषणा
आता अँमेझॉन फ्रेशने आपल्या ग्राहकांसाठी एक ऑफर आणली आहे. अँ मेझॉन फ्रेशने मँगो फिएस्टाची घोषणा केली आहे. हा महोत्सव सुरु झाला आहे आणि मे २०२२ च्या अखेरपर्यंत सुरू असेल.
या मँगो फिएस्टामध्ये ग्राहक कार्बाइड मुक्त, सुरक्षितपणे पिकवलेले आणि उच्च दर्जाचे ताजे आंबे निवडू शकतात ज्यामधे सफेदा, बंगनपल्ली, बदामी, सिंधुरा, थोतापुरी, अल्फान्सो आणि इतरांचा समावेश आहेत. अॅमेझॉन फ्रेश बंगळुरूमधील ग्राहकांसाठी कर्नाटक अल्फान्सो, कलापड व रासपुरी आणि कोलकातामधील ग्राहकांसाठी गुलाबखास व पर्कल्मन सारख्या प्रादेशिक आवडीच्या जातीचे आंबे ऑफर करत आहे.
ग्राहक अस्सल आंब्याचा आनंद जसे रत्नागिरी अल्फान्सो, देवघड अल्फान्सो, ऑरगॅनिक अल्फान्सो आणि प्रीमियम केसरयुक्त आंबे थेट रत्नागिरीमध्ये अॅमेझॉन कलेक्शन सेंटरमधून घेऊ शकतात. ग्राहकांना आंब्यांच्या खरेदीवेळी बँक ऑफर, कॅशबॅक आणि रिवॉर्ड्सवर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट देखील मिळवता येणार आहे.
बंगळुरू, दिल्ली, फरिदाबाद, गुडगाव, गाझियाबाद, नोएडा, अहमदाबाद, म्हैसूर, जयपूर, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, पुणे, कोलकाता आणि चंदीगड सह टॉप 15 पेक्षा जास्त शहरांमधील ग्राहकांना सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत दोन ते तीन तासांच्या डिलिव्हरी स्लॉटमध्ये उच्च-दर्जाच्या ताज्या आंब्याचा आनंद घेता येईल.
www.konkantoday.com