कोकण किनारपट्टीवर सध्या उष्णतेची तीव्र लाट, पारा ४० अंशावर


कोकण किनारपट्टीवर सध्या उष्णतेची तीव्र लाट कायम असून, हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याचा त्रास असह्य झाला आहे. परिणामी नागरिकांसह पर्यटकही प्रचंड हैराण झाले आहेत. सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकणात पर्यटकांची संख्या वाढली असताना उष्ण आणि दमट हवामानामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, अलिबाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संपूर्ण किनारपट्टी भागात तापमानाबरोबरच आर्द्रतेचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
अलिबागपासून रत्नागिरीपर्यंत तापमानाचा पारा सरासरी ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे. मात्र, केवळ तापमानच नव्हे तर ७० ते ८५ टक्क्यांदरम्यान असलेली आर्द्रता उकाड्याची तीव्रता अधिक वाढवत आहे. त्यामुळे ’फील्स लाइक’ तापमान प्रत्यक्षापेक्षा अधिक जाणवत असून नागरिकांना दिवसभर घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
मंदावल्याने उष्णतेचा तडाखर अधिकच जाणवत आहे. दिवसभर अंगाची लाही लाही होत असून रात्रीच्या वेळीही उकाड्यापासून दिलासा मिळत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. पंखे आणि कूलरचा वापर वाढला असला तरी दमट हवेमुळे त्यांचाही फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button