खारेपाटण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने १४ फेब्रुवारी रोजी खारेपाटण येथील महामार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या समोर आंदोलन
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण पूर्ण झाले असले तरी अनेक कामे अपूर्ण आहेत. महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खारेपाटण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने १४ फेब्रुवारी रोजी खारेपाटण येथील महामार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी दिला आहे.खारेपाटण शहरातून मुंबई – गोवा हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या महामार्गावर खारेपाटणमधील काही ठिकाणी बसथांबे बांधलेले नाहीत. खारेपाटण बॉक्सवेल येथील दोन्ही बाजूकडील सेवारस्त्यावर वाहन चालकासाठी बसविलेले बर्हिवक्र आरसे हे लहान आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथे मोठे आरसे बसविणे गरजेचे आहे. तसेच खारेपाटण महामार्गावरून ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणारा रस्ता खोदकामानंतर बनवून देण्यात येणार होता. तसेच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने रोलिंग लावण्यात येणार होते. ही दोन्ही कामे सध्या अपूर्ण आहेत. तसेच खारेपाटण बॉक्सवेलच्या बाजूने बांधलेली गटारे ही अर्धवट आहेत.
www.konkantoday.com