
मराठी राजभाषा दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने निबंध स्पर्धेचा आयोजन
रत्नागिरी:कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने मराठी राजभाषा दिन आणि नुकताच मराठी भाषेला मिळालेला अभिजीत भाषेचा दर्जा याचे औचित्य साधून जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पाचवी ते दहावी शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा राबवण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी विषय व शब्द मर्यादा खालील प्रमाणे
-शालेय गट – “मराठी भाषा काल आज उद्या” शब्दमर्यादा ५०० ते ७००
महाविद्यालयीन गट – “मराठी भाषा संवर्धनात युवकांचे योगदान” शब्दमर्यादा ८०० ते १२००
खुला गट- “अभिजात भाषेच्या दर्जाचे शिवधनुष्य पेलताना” शब्दमर्यादा १५०० ते २०००.
प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे विजेते निवडण्यात येतील विजेत्यांना रोख बक्षिसे, आकर्षक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात देऊन मराठी राजभाषा दिन (२७ फेब्रुवारी २०२५) रोजी कवी केशवसुत स्मारक मालगुंड रत्नागिरी येथील भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात येईल.
स्पर्धकांनी आपल्या निबंधाची हस्तलिखित किंवा टंकलिखित प्रत शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत श्री. अरुण तुकाराम मोर्ये ७४, प्रतिभासदन, मु. सत्कोंडी, पो. सैतवडे, या. जि. रत्नागिरी ४१५६१३ या पत्त्यावर पाठवावेत.
दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी वर्तमानपत्रातून विजेत्यांची नावे घोषित करण्यात येतील तसेच विजेत्यांना त्यांच्या संपर्कक्रमांकांवर कळविण्यात येतील. पारितोषिक वितरण समारंभ नियोजित वेळी नियोजित ठिकाणी पार पडेल त्यावेळी स्पर्धक किंवा स्पर्धकांच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष हजर राहून पारितोषिक स्वीकारावे.
अधिक माहितीसाठी अरुण मोर्ये ९१७५५२६६६०/८८०५७०४५५७ अमेय धोपटकर ८८८८०३३६२१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.