जिल्ह्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार : पालकमंत्री अनिल परब
रत्नागिरी: कोरोना- ओमिक्रोनच्या संकटामुळे बंद झालेल्या शाळा 1 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी दिली. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या स्थिर असल्याने शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शाळा 23 जानेवारीपासून सुरु झाल्या पण जिल्ह्यात स्थानिक पातळीवर 26 जानेवारीला निर्णय घेण्यात येणार होता. जिल्ह्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती बुधवारी पालकमंत्र्यांनी दिली.
www.konkantoday.com