देवगडच्या अनिश कोयंडेने बनवले मच्छिमार नौकेचे इलेक्ट्रिक इंजिन
इलेक्ट्रिकवर चालणारी टू व्हीलर आणि फोर व्हीलर आली, पण देवगडमधील अनिश कोयंडे या तरुणाने मच्छीमार बांधवांचा विचार करता तारका नावाचे इलेक्ट्रिक आउटबोर्ड इंजिन तयार केले आहे. या अगोदर आपण यामाहा किंवा सुझुकी कंपनीच्या पेट्रोलवर चालणाऱ्या मोटार इंजिन पाहिल्या असतील, तर पेट्रोल च्या खर्चापेक्षा ९०% बचत करत हे इलेक्ट्रिक इंजिन तुम्हाला १० व्हावात समुद्रात नेऊन परत किनाऱ्यावर आणू शकते. अनीश कोयंडे याने कोणतीही इंजिनिअरींग न करता फक्त इलेक्ट्रॉनिक विषयक अभ्यास आणि 3 वर्ष सातत्याने मेहनत घेत हे इलेक्ट्रिक आउटबोर्डचे स्वप्न सत्यता उतरवले आहे. हे इंजिन पूर्णपणे मेड इन इंडिया असून यामध्ये सर्व यंत्रणा आणि स्पेअर पार्ट्स, हार्ड वेअर हे भारतीय दर्जाचे आहे.