
मे महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यातून दोन हजार २३५ टन आंब्याची निर्यात
यावर्षी करोनामुळे इतर व्यावसायिकांप्रमाणे आंबा व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. यंदा हंगामाच्या सुरवातीला करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आंब्याच्या निर्यातीला एक महिना उशीर झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये पन्नास टक्केच निर्यात झाली. त्यानंतर गेल्या १ ते १० मे या कालावधीत दहा दिवसात दोन हजार २३५ टन आंब्याची निर्यात झाली. करोनामुळे निर्माण झालेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश निर्यातदारांनी मिळवले.
या वर्षी हवाई वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने जपान, कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आदी देशांना आंबा निर्यात करता आलेली नाही.
www.konkantoday.com