महामार्गवरील बोरज गावच्या हद्दीत जनावरांची हत्या

२०१९ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता, पोलिसांची भूमिका ठरणार महत्वाची

खेड: खेड पोलीस स्थानकांच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गालगतच्या बोरज ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाळीव जनावरांची हत्या केल्या जात असल्याचे उघड झाले प्रकार गोवंश हत्येचा असावा असे ग्रामस्थांचे म्हणणे असल्याने तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. जानेवारी २०१९ मध्ये अशाच प्रकार पिरलोटे परिसरात महामार्गालगत उघड झाला होता. यावेळी समाजकंटकांना अटक करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या रास्तारोको दरम्यान पोलीस आणि आंदोलन यांच्यामध्ये झालेल्या झटापटीत दोन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कमर्चारी गंभीर जखमी झाले होते. या घटनेचे पुनरावृत्ती टाळायची असेल तर पोलिसांनी वेळीच खबरदारी घेऊन या प्रकरणाचा छडा लावणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा एकदा खेडच्या जनतेच्या उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई गोवा महामार्गालगतच्या बोरज गावातील काही ग्रामस्थ आज सकाळी शेतीच्या कामासाठी बाहेर पडले असता त्यांना महामार्गालगतच्या परिसरात दुर्गंधी येऊ लागली. हे दुर्गंधी कुठून येते याची पाहणी केली असता महामार्गाच्या लगतच झुडपांमध्ये दोन प्राणांच्या शरीराचे अवशेष आढळून आले. हे दृश्य अगदीच हृदय हेलावून टाकणारे होते. ज्या नराधमांनी मुक्या जनावरांची हत्या केली होती त्यांचे काळीज नक्कीच दगडाचे असावे अशी पहिली प्रतिक्रिया हे दृश्य पाहणाऱ्यांची होती. इतक्या अमानुषपणे पाळीव जनावरांची हत्या करणाऱ्या नराधमांचा पर्दाफाश व्हावा या हेतून ग्रामस्थांनी पोलीस पाटील यांची भेट घेऊन या घटनेबाबत पोलिसांना खबर दिली.
ने या घटनेची खबर मिळताच पोलिसांची तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या संपूर्ण परिसराची तपासणी केली असता घटनास्थळी पोलिसांना जनावराच्या प्राण्यांच्या शरीराचे अवशेष आढळून आले. जे अवशेष आढळून आले त्यावरून रविवारी रात्री दोन जनावरांनाही हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी या ठिकाणची कसून तपासणी केली असता या ठिकाणी एका जनावराच्या कानात अडकवण्यात आलेला टॅग मिळून आला आहे. या टॅगवर असलेल्या क्रमांकावरून हे जनावर कुणाच्या मालकीचे असावे याच सहजपणे शोध घेता येणार आहे मात्र यासाठी संबंधित यंत्रणांची मानसिकता असणे गरजेचे आहे.
.२०१९ घडलेल्या घटनेनंतर मोठे आंदोलन झाल्यावर तेव्हा लाठीचार्ज झाला होता या घटनेनंतर गोवंश हत्या प्रकरणाला आळा बसला होता तीन वर्षांनी पुन्हा या घर्टनेची पुनरावृत्ती झाली असल्याने खेड तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button