
भोस्ते घाटातील अवघड वळण हे अपघाताला निमंत्रण देणारे
भोस्ते घाटातील अवघड वळण हे अपघाताला निमंत्रण देणारे आहे. मुंबई-गोवा रस्त्याचे सर्वेक्षण झाले तो सर्व्हे इंजिनिअरने कार्यालयात बसून केला का? नॅशनल हायवेचा अर्थ संबंधितांना समजलेला दिसत नाही. या धोकादायक वाकणामुळे अनेक अपघात होत आहेत. या धोकादायक वळणाची पाहणी चिपळूणचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांची चांगलीच खरडपट्टी केली. प्रवाशांचा जीव घेण्यासाठी रेवढे मोठे वळण ठेवले आहे का, असा सवाल विचारला व ताबडतोब हे वाकण काढण्यात यावे अशी मागणी मुकादम यांनी केली.
www.konkantoday.com