कोल्हापूर विमानतळावरून कार्गो वाहतूक सेवेला मंजुरी जिल्ह्यातील शेती, उद्योग, व्यवसाय वाढीला चालना मिळेल – पालकमंत्री सतेज पाटील

0
27

*कोल्हापूर विमानतळावरुन कार्गो वाहतूक सेवेसाठी (मालवाहतूक) भारतीय नागरी विमान सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) ने मान्यता दिली आहे. यामुळे जिल्ह्याच्या शेती, शेतीपूरक व्यवसाय, स्थानिक उद्योग आणि व्यवसाय वाढीला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर विमानतळाहून कार्गो वाहतूक सेवेला मंजुरी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील उद्योजक आणि शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. त्याचबरोबर स्थानिक उद्योगांना, शेती व शेतीपूरक उत्पादनाला उत्तेजन मिळेल. कृषी उत्पादन, औद्योगिक, दुग्धोपादन आणि वैद्यकीय क्षेत्रातून या कार्गो सेवेची मागणी होत होती. विमानतळावर कार्गो सेवेला मंजुरी मिळाल्यामुळे कोल्हापूरसह आजूबाजूच्या परिसरातील शेतमाल, उद्योगांच्या हवाई वाहतुकीसाठी या सेवेचा मोठा फायदा होईल.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here