<महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? नाराज नेते एकनाथ शिंदे गुजरातमध्ये ,भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा

0
224

नाराज असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्यानं चर्चांना उधाण आलंय. अखेर एकनाथ शिंदे यांचा ठावठिकाणा लागलाय.एकनाथ शिंदे हे गुजरामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे गुजरामधील सूरतच्या एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता वर्तवली जातेय. विधान परिषद निकालानंतर शिवसेनेमध्ये खदखद आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मोठा राजकीय निर्णय घेणार का, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आहेत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत 11 आमदार सोबत असल्याची माहिती कळतेय. एकनाथ शिंदे नाराज असल्याचा कारणामुळे रात्रभर बैठकांचं सत्र सुरु आहे. मोठा राजकीय भूकंप होण्याची भीती व्यक्त केली जातेय.काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे गुजरामध्ये आहे. सूरतच्या ली मेरिडिअन हॉटेलात ते थांबले आहेत. सुरत एअरपोर्टपासून दोन मिनिटांवर हे हॉटेल आहे. एकनाथ शिंदेच्या नाराजीनाट्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जातेय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत किती लोक आहेत, तो आकडा स्पष्ट झालेला नाही. अकरा आमदार एकनाथ शिंदेंसबोत असल्याची शक्यता आहे.या हॉटेलबाहेरचोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तसंच कोणत्याही माध्यमकर्मींना जाण्यात मज्जाव करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here