पेंडखळे गावातील श्री शंकरेश्वर मंदिर पुरातत्व अभ्यासकांना ठरतेय अभ्यासाचे ठिकाण


राजापूर तालुक्यातील पेंडखळे गावातील श्री शंकरेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिर सध्या इतिहास अभ्यासक आणि पुरातत्त्व रसिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. कातळात कोरलेली रचना, मध्ययुगीन शिल्पवैभव, शैववैष्णवगणपत्यशाक्त परंपरांचा संगम आणि परिसरात सापडलेले अश्मयुगीन मानवकृती कातळशिल्प यामुळे या ठिकाणाला कोकणातील दुसरे कैलास’ अशी ओळख मिळू लागली आहे.
कातळातून साकारलेले मंदिर स्थानिक अभ्यासकांच्या मते हे मंदिर राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे मठवाडी येथील सोमेश्वर मंदिराप्रमाणेच एकाच कातळातून वरून खाली खोदण्यात आलेले असावे. मंदिरावर सध्या आधुनिक बांधकाम, प्लास्टर आणि स्लॅबचे आवरण असले तरी मागील बाजूस दिसणार्‍या कातळाच्या रेषा, खोदकामाची शैली आणि संपूर्ण परिसराची रचना पाहता त्याचे मूळ कातळ-कोरीव स्वरूप स्पष्टपणे जाणवते.
मंदिराच्या गाभार्‍याजवळ पूर्वी कातळात खोदलेली विहीर असल्याचे ग्रामस्थ सांगतात. सध्या ती स्लॅबखाली  झाकली गेली असली तरी तिच्या अस्तित्वाच्या आठवणी अजूनही स्थानिकांच्या स्मरणात जिवंत आहेत. डोंगरावरील रहस्यमय मानवाकृती मंदिराच्या मागील बाजूस डोंगरावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. या पायर्‍यांनी वर गेल्यावर एक दुर्मिळ मानवकृती कातळशिल्प आढळते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button