आता तुम्ही तुमच्या प्रवासाच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेन पकडू शकता
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या प्रवासाच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेन पकडू शकता.यासाठी रेल्वे तुमच्याकडून कोणताही दंड वसूल करणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणाहून तिकिट काढलेले असते त्याला बोर्डिंग स्टेशन म्हणतात. आधी तुम्ही तुमच्या बोर्डिंग स्टेशनवरूनच ट्रेनमध्ये चढणे अपेक्षित असायचे. बोर्डिंग स्टेशन बदलण्यासाठीतुम्हाला तिकिटात बदल करावा लागतो. नाहीतर प्रवाशांना दंड भरावा लागतो. आता मात्र तुम्हाला तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलून प्रवास करता येणार आहे.
ज्या प्रवाशांना आपल्या बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करायचा आहे त्यांना ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधी ऑनलाइन बदल करावा लागेल. मात्र प्रवाशांना आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटनुसार जर एकदा प्रवाशांनी बोर्डिंग स्टेशन बदलले तर ते आपल्या मूळ बोर्डिंग स्टेशनवरून मात्र ट्रेन पकडू शकत नाहीत. जर प्रवाशांनी बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल न करताच दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेन पकडली तर त्याला दंड भरावा लागेल शिवाय बोर्डिंग स्टेशन आणि जिथून ट्रेन पकडली असेल त्या स्टेशनदरम्यानचे भाडेदेखील भरावे लागेल. ऑनलाइन स्वरुपात बुक केलेल्या तिकिटात तुम्ही बोर्डिंग स्टेशन बदलू शकता.
www.konkabtoday.com