
पेट्रोलचे भाव केंद्र सरकार नाही तर अमेरिका ठरवते,केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा अजब दावा
महाराष्ट्रात राज्यकर्ते पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करतात, पण पेट्रोलचे भाव केंद्र सरकार नाही तर अमेरिका ठरवते, असा अजब दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.औरंगाबादमध्ये ते बोलत होते. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांचं कंबरडं मोडलं असताना रावसाहेब दानवे यांनी हा नवा शोध लावला आहे.
www.konkantoday.com