
उदय सामंत रत्नागिरीचे तर अनिल परब सिंधुदुर्गचे पालकमंत्री?
रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून अनिल परब यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे.
उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना परिवहन, सांस्कृतिक किंवा पर्यटन विकास या पैकी खाते मिळणार असा अदांज आहे. तर अनिल परब यांना विधी व न्याय हे खाते मिळू शकते अशी चर्चा आहे. मागच्या वेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर होते. ते मूळचे रत्नागिरीचे होते. तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अनिल परब होतील अशी चर्चा आहे.
www.konkantoday.com