शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा सलग तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली

राज्यात आरोग्य सेवा भरती परीक्षेवरून गोंधळ माजलेला असताना आता शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा सलग तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे३० ऑक्टोबर रोजी होणार ही परीक्षा आता दिवाळीनंतर घेतली जाणार आहे. परीक्षेची सुधारीत तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली आहे.
राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी टीईटी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा ३० ऑक्टोबर रोजी होणार होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल केला आहे. पोट निवडणुकीमुळे परीक्षेच्या वेळेत बदल करण्यात आला असून, आता ही परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button