राज्यात जे जमले नाही ते डॉ तानाजीराव चोरगे यांनी जिल्हा बँकेत करून दाखविले , जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय सहकार पॅनेलची घोषणा २१ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर

0
25

राज्यात जे जमले नाही ते डॉ तानाजीराव चोरगे यांनी जिल्हा बँकेत करून दाखविले जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय सहकार पॅनेलची घोषणा त्यांनी काल केली
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू होतानाच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चार प्रमुख पक्षानी एकत्र येत सर्वपक्षीय सहकार पॅनेल जाहीर केले. या पॅनेलचे प्रमुख आणि विद्यमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी या सर्वपक्षीय सहकार पॅनेल जाहीर करताना २१ उमेदवारांची नावेही घोषित केली.
त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. यावेळी आपल्यावर संचालक आणि सर्व पक्षांच्या नेत्यांनी जो विश्वास दाखवला त्याबाबत डॉ. चोरगे यांनी सर्वांचे आभार मानले.सहकारात राजकारण नको जिल्हा बँकेने दाखवून एक नवा आदर्श निर्माण केल्याचेही चोरगे यांनी सांगितले
यावेळी दीपक पटवर्धन, किरण सामंत, विलास चाळके, गजानन पाटील, राजेंद्र सुर्वे, मधुकर टिळेकर, अनिल जोशी आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here