नवरात्रीत पाडणार परबांचा रिसॉर्ट : सोमय्या

कथित साई रिसॉर्ट प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी दि. 22 रोजी सोमय्या हे दापोली प्रांत कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी प्रांत अधिकारी, पोलिस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी भाजपचे केदार साठे, तालुका अध्यक्ष मकरंद म्हदलेकर, श्रीराम इदाते, संदीप केळकर, प्रवीण झगडे, स्वरूप महाजन, नगरसेविका जया साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हा रिसॉर्ट तोडण्यासाठी जो कन्सल्टंट नेमायचा आहे तो दोन दिवसात नेमला जाईल. आठवडाभरात तो आराखडा तयार करून देईल.  नवरात्री दरम्यान पुन्हा एकदा निविदा काढली जाईल आणि त्यानंतर हे बांधकाम नवरात्रीत तोडले जाईल, असा दावा यावेळी सोमय्या यांनी बोलताना केला आहे.
यावेळी सोमय्या म्हणाले, पोलिस अधिकारी यांच्याजवळ देखील मी विस्तृत चर्चा केली आहे. याबाबत अनिल परब यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी  सोमय्या यांनी केली. महावितरणच्या  अधिकारी यांनी सांगितले की 5 मार्च 2020 रोजी अनिल परब यांनी रिसॉर्ट कन्ट्रक्शनसाठी मीटर घेतला आहे. परब यांनी लॉकडाऊन कोव्हिड काळात रिसॉर्ट बांधला, हे आता उघड झाले आहे, असे देखील सोमय्या म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button