जिल्हा परिषदेच्या मालकीचे रस्ते दसर्यापूर्वी खड्डे न भरल्यास राष्ट्रवादी वृक्षारोपण करणार -संजय कदम
दापोली विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभाग व रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकी रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून एकही रस्ता वाहतुकीसाठी सोयीचा नाही. हे सर्वच रस्ते दसर्यापूर्वी सुस्थितीत व्हावे यासाठी आपण संबंधितांना लेखी पत्रव्यवहार केलेला आहे. जर का रस्ते दसर्यापूर्वी खड्डे भरले गेले नाहीत तर राष्ट्रवादीतर्फे याच खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन छेडले जाईल असा इशारा माजी आमदार संजय कदम यांनी दिला आहे.
www.konkantoday.com