कोकणातील लोककलावंतांना आर्थिक सहकार्य द्या -डॉ. विनय नातू

कोकणातील अनेक कलाकार भजन व गणपतीमधील जाखडी नृत्य, असे स्वतंत्र कार्यक्रम राबवून अर्थार्जन करीत असतात. शेतीची कामे संपल्यावर या लोककलांच्या कार्यक्रमांना सुरूवात होते. श्रावण महिन्यात व गणपतीमध्ये सार्वजनिक कार्यक्रम करणार्‍यांवर संपूर्ण बंदी होती. तसेच घरगुती कार्यक्रमांनाही बंदी असल्याने या कलाकारांना कसलेच अर्थार्जन झाले नाही. शासनाने या कलावंतांना आर्थिक सहकार्य करावे असे निवेदन माजी आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. लॉकडाऊन असल्याने नमनाचे कार्यक्रमही ऐन हंगामात झाले नाहीत. बांधकाम मजुरांना ज्याप्रमाणे आर्थिक सहकार्य केले गेले, तसेच कोकणातील या लोककलावंताना आर्थिक सहकार्य म्हणून कोविड-१९ अंतर्गत विशेष निधी मिळावा, अशी मागणी डॉ. नातू यांनी केली आहे.
konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button