कोरोनासंबंधी RTPCR टेस्टचं बनावट सर्टिफिकेट तयार करुन विकणाऱ्या सायबर कॅफे चालकांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या

कोरोनासंबंधी RTPCR टेस्टचं बनावट सर्टिफिकेट तयार करुन विकणाऱ्या एका सायबर कॅफे चालकांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोरोना निगेटिव्ह असल्याचं खोटं सर्टिफिकेट आरोपी करुन देत असत
.दक्षिण मुंबईतून पोलिसांना या सायबर कॅफेच्या ऑपरेटरला पोलिसात अटक करण्यात आली आहे. तसेच त्याचे संगणक आणि प्रिंटर देखील जप्त करण्यात आले आहे.मुंबईत अनेक ठिकाणी अशा बोगस कागदपत्र विक्रीचा काळा धंदा सुरु आहे. मुंबईमध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना लसीचे दोन डोस मिळाले नाहीत. मात्र ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर टेस्टची निगेटिव्ह रिपोर्ट असावा लागतो किंवा लसीचे दोन्ही डोस लागतात. त्यामुळे लोक रेल्वे प्रवासाला लागणार पास मिळवण्यासाठी 700 रुपये खर्चून बोगस आरटीपीसीआर रिपोर्ट तयार करुन घेत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button