कळंबणी उपजिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर,९३ पैकी ५६ पदे रिक्त : सुविधांची वानवा, रुग्णांची गैरसोय


मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेले व अपघातग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात अनेक अपुऱ्या सुविधा असल्याचे चित्र दिसत आहे हे रुग्णालय गेल्या काही वर्षात बांधकाम विभागाचे काही अधिकारी व ठेकेदार यांच्यासाठी निधीचे कुरण बनले आहे. या रुग्णालयाच्या स्थापनेत अनेक पदे रिक्त असल्याने एका बाजूला आरोग्य सेवा कोलमडली आहे. काही अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने देखभाल दुरुस्तीची नावाखाली गेल्या काही वर्षात लाखो रुपयांचा खर्च शासकीय तिजोरीतून झाला आहे. अनेक कामे ठेकेदाराला नेमून दिलेल्याप्रमाणे झाली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कामाचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज असून याकडे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
नांदेड शासकीय रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर या रुग्णालयाच्या अवस्थेत कधी सुधारणा होणार की व्हेंटिलेटरवर असलेले हे रुग्णालय जीव सोडणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आस्थापनेत ९३ पदे मंजूर आहेत. त्यातील ५६ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कार्यरत यंत्रणेवर ताण पडत आहे. रिक्त पदांचा थेट परिणाम रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर होत आहे. रुग्णालयातील २ सुसज्ज रुग्णवाहिकाही चालकांअभावी धुळखात आहेत. महामार्गावर अपघात घडल्यास उपचारासाठी रुग्णांना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते. मध्यवर्ती ठिकाणी असलेले उपजिल्हा रुग्णालय सोयीचे ठरत असल्याने रुग्णांची संख्या भरपूर असते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांची गैरसोय होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button