एकतर्फी प्रेमातून विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या
एकतर्फी प्रेमातून विष प्राशन करून तरुणाने आत्महत्या हा प्रकार रत्नागिरी घडला आहे
एकतर्फी प्रेमातून विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला.ही घटना बुधवार सकाळी घडली.
प्रसाद एकनाथ भाटकर (23,मुळ रा.देवरुख सध्या रा.मिरजोळे जांभूळ फाटा,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.प्रसाद एमआयडीसी परिसरात नोकरीला होता.मंगळवारी रात्री फिनोलेक्स कॉलेजरोडवर तो विषारी द्रव प्यायल्याने बेशुध्द अवस्थेत आढळून आला यांनी तातडीन त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते.परंतू बुधवारी सकाळी प्रसादचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com