
जिल्ह्यामध्ये कोवीड लसीचा साठा संपल्यामुळे नागरी आरोग्य केंद्र चिपळूण, नागरी आरोग्य केंद्र झाडगाव व पोलीस मुख्यालय दवाखाना लसीकरण सत्रे लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत स्थगित
रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागा करिता covid-19 लसीकरणासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून लस घेण्याची सोय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याद्वारे लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्याचे दिसून येत आहे.
परंतु जिल्ह्यामध्ये कोवीड लसीचा साठा संपल्यामुळे नागरी आरोग्य केंद्र चिपळूण नागरी आरोग्य केंद्र झाडगाव व पोलीस मुख्यालय दवाखाना रत्नागिरी येथील दिनांक 25.04.2021 व दिनांक 26.04.2021 रोजीची पूर्व नियोजित कोवीड लसीकरण सत्रे लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. ज्या कोवीड लसीकरण केंद्रावरती लससाठा उपलब्ध आहे तेथील सत्रे लस साठा असेपर्यंत सुरु राहतील. जिल्ह्याला आतापर्यंत 147080 एवढा लस साठा राज्यस्तरावरुन प्राप्त झाला आहे. यापूढे राज्यस्तरावर कोवीड लस साठा उपलब्ध होताच रत्नागिरी जिल्ह्यासाठी लस पूरवविण्यात येणार असून, त्यानंतर पुन्हा जिल्ह्यातील स्थगित केलेली लसीकरण सत्रे पुन्हा सुरु करण्यात येतील. तरी लाभार्थ्यांनी याची नोंद घेऊन जिल्हा आरोग्य विभागास सहाकार्य करावे.
www.konkantoday.com