
भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला चिपळूण पूरग्रस्त भागाचा दौरा व्यापारी आणि पूरग्रस्तांच्या घेतल्या जाणून व्यथा chitrawagh visit to chiplun
चिपळूण }: भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी चिपळुनातील पूरग्रस्त भागाची पाहणी करीत पूरग्रस्तांशी संवाद साधला. तसेच ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहातील भाजप मदत केंद्राला भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नियोजनबद्ध कामाचे कौतुक केले.
BJP Vice President chitra wagh visited flood affected chiplun in ratnagiri district
चिपळुणात २२ रोजी आलेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे चिपळूणचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसह स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तीने पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. यामध्ये भाजपा देखील मागे नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपा प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी आमदार मधू चव्हाण, आमदार प्रसाद लाड आदी भाजपा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना सहकार्याचा हात दिला आहे. दरम्यान नुकतेच भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी चिपळूणचा दौरा करीत पूरग्रस्त भागाची पाहणी करत पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी भाजपा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी काही पूरग्रस्तांना यावेळी दिली. तर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. तसेच व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करत व्यथा जाणून घेतल्या. यावेळी कोकणातील जनतेच्या धैर्य आणि संयमाचे चित्रा वाघ यांनी कौतुक केले. याच बरोबर पूरग्रस्त भाजपा पदाधिकारी नगरसेवक परीमल भोसले, वैशाली निमकर यांच्या घरी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि दिलासा दिला. यावेळी भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी निलम गोंधळी, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर, नगरसेवक निशिकांत भोजने, परिमल भोसले, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, दक्षिण रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संतोष मालप, नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, संदेश भालेकर, प्रफुल्ल पिसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com